उदगीर शहर व परिसराला अवकाळी पावसाने झोडपून काढले!

उदगीर : शहर आणि परिसराला ४.३० च्या सुमारास विजांचा गडगडाट, गारा आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. 


यात अनेक घराची पत्रे उडाली, झाडे उन्मळून पडली. उन्हाळी खाद्यपदार्थ वाळत घातलेल्या अनेक गृहिणीची तारांबळ उडाली. या अवकाळी पावसामुळे आंब्याचे खूप मोठे नुकसान होणार आहे. सततचे बदलते वातावरण आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. या पावसामुळे बरेच नुकसान झाले आहे!