उदगीर : येथे रोजगाराच्या शोधात नांदेड जिल्ह्यातील बाचेगाव (ता.धर्माबाद) येथील ११ कुटुंबातील जवळपास ५२ लोक उदगीर येथे लॉकडाऊनमूळे अडकून पडले होते.
या कुटुंबांनी आपले नायगाव मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांना मदतीसाठी हाक मारली आणि राहुल केंद्रे माणुसकीचे दर्शन दाखवत मदतीसाठी धावून गेले. त्यांनी उदगीर भाजपा शहराध्यक्ष उदयसिंग ठाकूर यांना सांगून या कुटुंबाना गहू, तांदूळ, डाळ व इतर अत्यावश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. यावेळी बबन दादा मुदाळे,युवा नेते सागर बिरादार,विकास जाधव,काही कार्यकर्ते व पदाधिकारी सोबत घेऊन हे साहित्य दिले.