पत्रकार म्हणून जबाबदारी जास्त आहे! 

पत्रकार म्हणून जबाबदारी जास्त आहे!



*******
ही घटना कदाचित हिंगोली मधील आहे. अलीकडे पत्रकार म्हणून मिरवणारी एक 'नवीन जमात' उदयाला आली आहे. खरे तर पत्रकार म्हणून सामाजिक जबाबदारीचे भान अधिक असले पाहिजे. पत्रकारांनी सध्याच्या संकटात पोलीस आणि प्रशासनाला मदत करणे अपेक्षित आहे. याउलट मी पत्रकार म्हणून मला स्पेशल वागणूक हवी असा हट्ट करणारे काही उथळ पत्रकार सर्वत्र मिरवत आहेत. अलीकडे मोबाईल पत्रकारांचा तर सुळसुळाट झाला आहे. पोलिस घरी बसा सांगतात, पत्रकार त्यांची शूटिंग करून पोलिसांना धमकी देत असेल तर पोलिसांनी पालथं घालून तुडविले पाहिजे. जर खरेच लोकमतचा पत्रकार असेल तर मालकांनी त्याला हाकलून दिले पाहिजे. सर्व यंत्रणा अहोरात्र झटत आहे. सर्व विभागाचे 'कोरोना वारीयर्स' हवालदिल आहेत. तेव्हा त्यांच्या कामात अडथळा करणे सामाजिक गुन्हा आहे. तेव्हा पोलिसांनी अशा 'पत्रकारांना प्रसाद वाटप' बिनधास्त करावे. देश, कायदा व समाज यापेक्षा कोणीही मोठा नाही. पत्रकार म्हणून समाजात मिरवायचे असेल तर पोलिसांना दमात घेतले पाहिजे हा गैरसमज काही पत्रकारांमध्ये बळावला आहे. तेव्हा हा समज तातडीने दूर व्हावा. पोलीस व पत्रकार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, एक बाजू वरचढ होण्याचा प्रयत्न करीत असेल तर अतिशय घातक प्रथा रूढ होऊ पहात आहे. तेव्हा पोलिसांनी या संकटात कायदा व समाजाचे रक्षण करावे. पत्रकार म्हणून सहकार्य जरूर करावे, जर कोणी या संकटातही विशेष अधिकार मागत असेल तर प्रसाद वाटप करावे! #पत्रकार_शक्तिमान_नाही